Breaking News
आप नवी मुंबई तर्फे - "स्वराज्य संवाद " जनसभा शृंखलेचा सलग चौथा दिवस पण यशस्वी
आप महाराष्ट्र राज्य समितीच्या नेतृत्वा खाली, दिनांक १२ ते १८ जून दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हासमितीद्वारे महाराष्ट्र भर कानाकोपऱ्यात अधिकाधिक जनसभा आयोजित होत आहेत.
टीम आप नवी मुंबई तर्फे सुध्दा दिनांक बुधवार दिनांक १५ जून रोजी, ऐरोली - स्वामी विवेकानंद उद्यान सेक्टर १५ , गणेश मंदिर चौक सेक्टर १६ आणि दत्त मंदिर सेक्टर १६ , दिघा - दुर्गा नगर, कोपरखैरणे - गुरुद्वारा समोर अश्या ' स्वराज्य संवाद ' जनसभा घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद केला. पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणुन काम करण्यासाठी ५० स्थानीय नागरिकांनी आप पार्टीसाठी आपले नाव नोंदणी केली.
ह्या जनसभांच्या यशस्वी आयोजनासाठी टीम आप नवी मुंबईच्या प्रिती शिंदेकर, मिलींद तांबे, मानसी पवार, देवराम सुर्यवंशी, नामदेव साबळे, गायत्री तांबे, आरती सोनवणे, अशोक कदम, नीना जोहरी, मधु चावला, पटेल सर, आरती शहा आणि पुजा गोसावी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
ह्या पुढे, शुक्रवार दिनांक १६ जून रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यू गणेश नगर, ठाणे बेलापूर रोड, दिघा (दिघा तलावाच्या पुढे) येथे आप महाराष्ट्र राज्य समितीच्या उपस्थित, पूर्ण नवी मुंबई कार्यकर्त्यांची मोठी जनसभा होणार आहे.
रिपोर्टर