महिला ऑटोरिक्षा चालक झाली आप नवी मुंबईची पदाधिकारी
- by Santosh Jadhav
- Jun 20, 2023
महिला ऑटोरिक्षा चालक झाली आप नवी मुंबईची पदाधिकारी
नवी मुंबई : राष्ट्रीय आम आदमी पार्टी हि फक्त सुशिक्षित लोकांचीच पार्टी नसून, आपल्या देशाच्या प्रत्येक देशभक्त, सुसंस्कृत, संविधान प्रेमी, इमानदार आणि मेहनीतीची कमाई खाणाऱ्या भारतीयांची पार्टी आहे. आज आप नवी मुंबईच्या टीम मध्ये , समाजातील सर्वच स्तरातील, सर्व धर्म-जातीचे नागरिक सामील होत आहेत. टीम आप नवी मुंबईमध्ये उच्चशिक्षित मोठमोठ्या पदावर काम करणारे नागरिक तर आहेतच, पण त्याच बरोबर सफाई कामगार, माथाडी कामगार, ऑटोरिक्षा चालक अश्याही मेहनती व्यक्ती आहेत. टीम आप नवी मुंबई तर्फे स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन नेहमीच, महानगरपालिका सफाई कामगाराच्या हस्तेच करण्यात येते. आप नवी मुंबईचे अध्यक्ष श्यामभाऊ कदम, हे कायमच, समाजाच्या सर्व थरातील अश्या व्यक्ती, ज्या नवी मुंबईत आप तर्फे निवडणूक लढवून, जनप्रतिनिधी बनून प्रामाणिकपणे लोकसेवा करण्याच्या संधीची वाट बघत आहेत अश्या लोकांच्या शोधात असतात.
ह्याच पार्शवभूमीवर, नवी मुंबई सहसचिव नीना जोहरी कोपरखैरणे ह्याच्या प्रयत्नाने, अनेक महिला ऑटोरिक्षा चालक आप नवी मुंबई मध्ये सामील झाल्या आहेत. ह्या टीम मधून पूजा गोसावी - महिला ऑटोचालक ह्यांची आप नवी मुंबई ऑटो-रिक्षा युनियन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती पत्र आप महाराष्ट्र राज्य सचिव धनंजयजी शिंदे ह्याच्या हस्ते देण्यात आले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav