मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार विरोधात आपची नवी मुंबई आणि राज्यभर निदर्शने
- by Santosh Jadhav
- Jul 20, 2023
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार विरोधात आपची नवी मुंबई आणि राज्यभर निदर्शने
मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची निर्वस्त्र अवस्थेत दिंड काढण्यात आली आहे. ह्या अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी, आप महाराष्ट्र कार्यकारणीतर्फे, पूर्ण महाराष्ट्रातील विभागीय टीम्सना, गुरुवार २० जुलै रोजी आपापल्या स्थानीय विभागात, शांतीपूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. ह्या आवाहनास प्रतिसाद म्हणून, आपच्या ऐरोली टीम तर्फे ऐरोली - सेक्टर ३ स्टेशन समोर, उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर आणि युवा अध्यक्ष संतोष केदारे ह्यांच्या नेतृत्वाखाली, मानसी राऊत, मिलिंद तांबे, आरती सोनावणे, श्रध्दा तांबे इत्यादी स्थानीय कार्यकारणी सदस्य आणि कार्यकर्त्याच्या उपस्थितीत, तसेच कोपरखैरणे स्टेशन समोर सहसचिव नीना जोहरी ह्यांच्या नेतृत्वाखाली किरण कोद्रे, पटेल सर, आरती शाह, पूजा गोसावी इत्यादी कोपरखैरणे नोड पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतीपूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले.
हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलेली नाही, आत्तापर्यत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे - प्रीती शिंदेकर उपाध्यक्ष
मणिपूर येथील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर घटनेबाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही - नीना जोहरी - सहसचिव
पंतप्रधान सर्व जग फिरत आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का महौल असे वातावरण तयार केले आहे, आज देशात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाही, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही - संतोष केदारे - युवा अध्यक्ष - आप नवी मुंबई.
मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav