Breaking News
पालकमंत्री ना. उदयजी सामंत खा. विनायक राऊत यांनी खेडचे पत्रकार दिलीप देवळेकरांचा रत्नागिरी येथे सत्कार केला
खेड :- कोकण विभागिय पत्रकार अधिस्विकृती समितीवर खेड तालुक्यातील दे. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप देवळेकर यांची निवड झाल्याने आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना. उदय सामंत खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राऊंड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी दै. रत्नागिरी टाइम्सचे अभ्यासू व महाराष्ट्रातून अनेक उत्कृष्ठ पुरस्कार प्राप्त पत्रकार दिलीप देवळेकर यांची महाराष्ट्र 'शासनाने अधिस्वीकृती नियुक्ती केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. दिलीप देवळेकर हे एक अभ्यासू व उच्च शिक्षित पत्रकार म्हणून परिचयाचे असून त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी गौरव केल्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
फोटो - खेडचे दैनिक रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार दिलीप देवळेकर यांची महाराष्ट्र शासनाने अधिस्वीकृती पत्रकार म्हणून नियुक्ती केल्या बद्दल स्वातंत्र्य दिनी सन्मानचिन्ह देवून गौरव करताना रत्नागिरी जिल्हयाचे पालक मंत्री ना. उदयजी सामंत, खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.(छाया तनिष देवळेकर खेड)
रिपोर्टर