महिलेचा बलात्कार करण्याचे उद्देशाने जिवे मारण्याचा धाक दाखवुन रिक्षामधुन अपहरण करून विनयभंग करणाऱ्या २ आरोपीना ताब्यात घेतले
- by Santosh Jadhav
- Sep 09, 2023
महिलेचा बलात्कार करण्याचे उद्देशाने जिवे मारण्याचा धाक दाखवुन रिक्षामधुन अपहरण करून विनयभंग करणाऱ्या २ आरोपीना ताब्यात घेतले
डोंबिवली : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली भागात घडला. सुदैवाने गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधान व धाडसामुळे महिलेचा जीव वाचला असून दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणाऱी एक महिला शुक्रवारी संध्याकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला हाेता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. महिलेला संशय आल्याने तिने आरडा ओरडा केला.
मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने शस्त्राचा धाक दाखवत महिलेला निर्जनस्थली नेले. याच दरम्यान गस्तीवर असणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांना याचा संशय आला. दोघांनी या रिक्षाचा पाठलाग करत नराधमांना पकडले. यावेळी आरोपीने एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले.
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रभाकर पाटील हा रिक्षा चालवतो. तर त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav