नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


दीड दिवसांच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तीचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या चोख व्यवस्थेत भावपूर्ण वातावरणात विसर्जन

दीड दिवसांच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तीचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या चोख व्यवस्थेत भावपूर्ण वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : १९ सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच १४१ कृत्रिम विसर्जन स्थळे अशा १६१ विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या ९८७१ श्रीगणेश मूतींना भावभक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

सर्व विसर्जन स्थळांवर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेने चोख व्यवस्था केली होती. विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक तत्पर होते. २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ७२११ घरगुती तसेच २५ सार्वजनिक मंडळांच्या ७२३६ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर २६२८ घरगुती तसेच ७ सार्वजनिक २६३५मंडळांच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे ९८३९ घरगुती व ३२ सार्वजनिक मंडळांच्या एकूण ९८७१ श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले.

यामध्ये बेलापूर विभागात ५ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १९५४ घरगुती व १० सार्वजनिक तसेच १९ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ३४५ घरगुती व ३ सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन झाले.

नेरुळ विभागात २ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ९८३ घरगुती तसेच २६ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ३६५ घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

वाशी विभागात २ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ६९७ घरगुती व ०२ सार्वजनिक तसेच १६ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ३४२ घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

तुर्भे विभागात ३ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ४०१ घरगुती व ०३ सार्वजनिक तसेच १७ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ४५४ घरगुती व ०३ सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन झाले.

कोपरखैरणे विभागात २ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ८९८ घरगुती तसेच १५ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ३८३ घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

घणसोली विभागात ४ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १२१० घरगुती व ०६ सार्वजनिक तसेच २१ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये २४४ घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

ऐरोली विभागात ३ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ८५७ घरगुती व ०४ सार्वजनिक तसेच १८ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ४०८ घरगुती व १ सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

दिघा विभागात १ नैसर्गिक विसर्जन स्थळावर २११ घरगुती तसेच ०९ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ८७ घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १६३विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तींना निरोप देण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन स्थळांवर गर्दी होऊ नये तसेच नैसर्गिक जलस्त्रोत शुध्द रहावेत याकरिता कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात १४१ इतक्या मोठया संख्येने नागरिकांना सोयाीच्या ठिकाणी विभागाविभागांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. २६३५ श्रीगणेशमूर्तीचे भाविकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले.

त्याचप्रमाणे १४ मुख्य विसर्जन तलावांमधील जलाशय प्रदूषित होऊ नयेत यादृष्टीने फार आधीपासूनच या तलावांतील विशिष्ट भागामध्ये विसर्जन करता यावे यादृष्टीने गॅबियन वॉल रचना करण्यात आली असून त्याचाही वापर मोठया प्रमाणावर करीत नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा पार पडण्यावर भर दिला.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे विसर्जन व्यवस्थेवर बारकाईने लक्ष होते. अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ यांनी विर्सजन स्थळांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पहाणी केली. परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ श्रीराम पवार हे देखील संबधित विभाग अधिका-यांसह आपापल्या परिमंडळ क्षेत्रात भेटी देत होते.

सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था तसेच उपस्थित भाविकांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकासह व्यासपीठ व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्थाही आहे. मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात असून संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतीशीलपणे कार्यरत होती. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत होते.

नवी मुंबई हे स्वच्छतेत अग्रणी असलेले शहर असून विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये १० टन ९४५ किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनीदेखील ठिकठिकाणी भेटी देत स्वच्छता कार्याला वेग दिला.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे व वाहतूक पोलीस विभागाचे उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस यंत्रणाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दक्षतेने कार्यरत होती.

दीड दिवस कालावधीचे श्रीगणेशमूर्ती विसर्जन नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत सुव्यवस्थित रितीने पार पाडल्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नागरिकांचे आभार मानले आहे. आता शनिवार दि.२३ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीगणेशमूर्तीसह होणारे जेष्ठागौरी विसर्जन लक्षात घेता विसर्जनस्थळी अधिक संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचे असल्याचे लक्षात घेऊन अधिक सक्षमतेने यंत्रणा सज्ज असणार आहे. नागरिकांनीही विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे व इकोफ्रेंडली दृष्टिकोन जपत आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावांचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट