राज्यात लॉकडाऊन लावण्या अगोदर सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न सोडवा -दत्ता वाकसे
- by Vikas Banpatte
- Apr 11, 2021
राज्यात लॉकडाऊन लावण्या अगोदर सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न सोडवा -दत्ता वाकसे
नवी मुंबई : आज राज्यामध्ये पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय धारक व हातावर पोट असणारे मात्र खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करताना दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारने अगोदर हातावर पोट असणाऱ्या आणि दिवसभर कष्ट करून रात्रीच जीवन जगणाऱ्या व्यवसायिकांना तात्काळ त्यांच्या जनजीवनाचा प्रश्न सोडवावा अन्यथा राज्यभर धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने भीक मागो आंदोलन करणार असल्याचे समितीचे नेते दत्ता भाऊ वाकसे यांनी म्हटले आहे
पुढे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणाले की तशी परिस्थिती पाहिली तर विविध ठिकाणी होत असलेल्या निवडणुका सहा पोटनिवडणुकीच्या ठिकाणी राज्यकर्ते विरोधक खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमून स्वतःच्या स्वार्थापायी सर्वसामान्य वर अन्याय करत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करायचा असेल तर अगोदर हातावर पोट असणाऱ्या आणि कष्टकरी गरीब दीनदलित त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा आणि त्यानंतर राज्यामध्ये लॉकडाऊन करावा. सर्वसामान्य आणि सकाळी उठून दिवसभर काम केले तरच खायला भेटते अशा लोकांची संख्या या राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ विशेषता या सर्वसामान्य कष्टकरी कामगार आणि दिवसभर काम करून कष्ट करून रात्रीच जेवण मिळत असलेल्या कामगारांना व छोट्या - छोट्या उद्योग-व्यवसाय धारकांना तात्काळ महाराष्ट्र सरकारच्यावतीने महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आर्थिक मदत मिळवून द्यावी त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या छोटे छोटे व्यवसाय धारकांना आधार मिळेल व त्या माध्यमातून त्यांना रोजच्या जनजीवनाचा प्रश्न सुटेल त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन करण्याच्या अगोदर सर्वसामान्य आणि कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्या छोटे-छोटे व्यवसाय धारकांना आधार देऊन राज्यांमध्ये लॉकडाऊन लावला तरी चालेल त्यामुळे रात्रंदिवस कष्ट करून जगणारे आणि स्वतःची उपजीविका दिवसभर काम करून भागवणाऱ्या उद्योग-व्यवसाय धारकांना आधार मिळेल त्यामुळे तात्काळ छोटे छोटे उद्योग धारकांना शासनाकडून आर्थिक मदत देऊन त्यांच्या उद्योग-व्यवसायात भर द्यावी असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मध्ये धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे नेते दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Vikas Banpatte