Breaking News
काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू काश्मीर विधानसभेत राखीव जागा
नवी दिल्ली : राज्यसभेत विधेयक मंजूर स्थलांतरित काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापित लोकांना जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत आरक्षण देणारी दोन विधेयके राज्यसभेने सोमवारी मंजूर केली आहेत. दोन्ही विधेयके - जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, २०२३ लोकसभेने ६ डिसेंबर रोजी मंजूर केले होते.
आता राज्यसभेच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान सांगितले की, पूर्वी जम्मूमध्ये ३७ जागा आरक्षित होत्या. आता नवीन परिसीमन आयोगाच्या शिफारशीनंतर ४३ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी काश्मीरमध्ये ४६ जागा आरक्षित होत्या, त्या आता ४७ इतक्या वाढवण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर