Breaking News
बेलदार समाजाचा २५ फेब्रुवारी रोजी खोपोली येथे वधू - वर सूचक मेळावा
राज्यस्तरीय बेलदार वधु - वर परिचय मेळावा रायगड जिल्ह्यात खोपोली येथे २५ फेब्रुवारी रोजी होत आहे.
सन वर्ष २०१९ ला कोरोना चालु व्हायचे अगोदर सहा महिने अगोदर मला श्री. अशोक पवार , नवी मुंबई यांचा फोन आला कि, माझ्या आते बहिणीच्या दोन मुली उच्चशिक्षित आहेत, त्यांच्या लग्नासाठी मुल शोधत आहोत. तुम्ही समाजात कार्यक्रमानिमित्त जास्त फिरत असता , बघा लक्षात आले तर सांगा .त्यावेळेस डिजिटल मिडीया अधिक प्रभावीपणे कार्य करीत असल्याचे लक्षात आले.
जवळपास सर्वाच्या घरात स्मार्टफोन असल्याचे लक्षात आले , एका क्षणात टाकलेला मॅसेज हजारो लोकापर्यत पोहचून माहितीचे उत्कृष्ट पद्धतीने प्रसारण जलदगतीने होत होते.
मला कल्पना सुचली आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून फायदा समाजसेवेसाठी करूया , समाजाला जोडण्याचे मोठे माध्यम बनु शकते याची जाणीव झाली . त्यावेळेस समाजामध्ये काही व्हॉट्सअँप ग्रुप बेलदार समाजाचे कार्यरत होते. पण त्यांचा वापर निव्वळ मनोरंजनापुरता होत होता.
कुणीही सामाजिक कार्यक्रम घेण्याचे धाडस करीत नव्हते. त्यावेळी श्री. अशोक पवार यांच्या कल्पनेनुसार पहिला बेलदार समाजाचा वधू - वर सूचक मेळावा देण्याचे धाडस श्री. आप्पासाहेब चव्हाण यांनी दाखविले. वधू - वर सुचक मेळाव्याची माहिती समाजातील लोकांना व्हावी यासाठी बेलदार समाजाच्या व्हॉट्सअँप ग्रुप, फेसबुकच्या माध्यमातून समाजापर्यत पोहचविले.
कार्यकर्ते व समाजबांधवांचे वधू - वर सूचक मेळावा घेण्यासाठी दूरध्वनी येऊ लागले. तसा - तसा उत्साह वाढु लागला . वधूवरांचे परिचय माहितीपत्रक व्हॉट्सअँपला येऊ लागले. वैयक्तिक व्हॉट्सअँपवर मर्यादा येत होती प्रसार अधिक प्रमाणात होत नव्हता . त्यावेळी वधू-वरांचे परिचय माहितीपत्रक पाठवण्यासाठी विशेष व्हॉट्सअँप ग्रुपची निर्मिती केली. व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये ही समाजबांधवांनी मुला - मुलीचे परिचय माहितीपत्रक मोठ्या प्रमाणात टाकण्यास सुरुवात झाली. यामध्ये वधु - वर समिती सदस्यांचे बहुमोल योगदान आहे.
पनवेल , सातारा , पुणे , नाशिक , वसई येथे वधू - वर सूचक मेळावा यशस्वी झाल्यानंतर येत्या २५ फेब्रुवारी रोजी खोपोली , जिल्हा - रायगड येथे बेलदार समाजाचा वधू - वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्री. अप्पासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
रिपोर्टर