भीमराया गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न
- by Irfan shaikh
- Apr 12, 2021
भीमराया गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न
सिम्बॉल ब्लूज म्युझिक प्रॉडक्शन निर्मित "भीमराया" या गीताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्याने दि.१२ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण सोहळा मा.श्री. जगदीशभाई गायकवाड (उपमहापौर, पनवेल मनपा) मा.श्री. सुधाकरजी सोनावणे (माजी महापौर, नमुंमपा) मा.श्री. सिद्रामजी ओव्होळ (दलितमित्र पुरस्कार प्राप्त भिमसैनिक) मा.श्री. अॅड. महेश भोसले (विधिज्ञ मुंबई उच्च न्यायालय) मा.श्री. राजेंद्र घरत (उपसंपादक, दैनिक नवे शहर) मा.श्री. संजय महाडिक (संपादक, कोकण दर्पण) डॉ.प्रशांत थोरात (नेत्ररोग तज्ञ) प्रा. रविंद्र पाटील (लेखक,शिवव्याख्याते) आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. गीतकार मधुकर वारभुवन लिखित "भीमराया" गीताचे संगीत व संगीत संयोजन हे आजचे नवतरूण संगीतकार प्रशांत-निशांत यांनी केले असून गायिका दिव्या अहिरे हिच्या मधूर आवाजात स्वरबद्ध केले आहे. भावस्पर्शी संगीत, सखोल शब्दरचना आणि वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा साज असे हे अप्रतिम गीत युट्यूबवर प्रसारित करण्यात आले.
-वैभव अशोक वऱ्हाडी
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Irfan shaikh