कोरोनाने पोलीस उपनिरीक्षकचा मृत्यू ; मुंबई पोलीस विभागात आतापर्यत १०१ शहीद झालेले
- by Irfan shaikh
- Apr 13, 2021
कोरोनाने पोलीस उपनिरीक्षकचा मृत्यू ; मुंबई पोलीस विभागात आतापर्यत १०१ शहीद झालेले
माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नागरे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वाकोला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा कोरोनाने आज मृत्यू झाला. त्याच्यावर बीकेसीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. दगडे यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
मूळचे सातारचे रहिवासी असलेले दगडे हे १९८८ साली पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत काम केले. तीन वर्षापूर्वी त्यांना उप निरीक्षकपदी बढती मिळाली होती. बढतीनंतर सुरुवातीला ते साकीनाका त्यानंतर सध्या ते वाकोला पोलीस ठाण्यात ते काम करत होते. आठ दिवसांपूर्वी दगडे यांची कोविड चाचणी करण्यात आली होती.
त्यांना कोविडची बाधा झाल्यावर त्यांच्यावर बीकेसीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. दगडे यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासदेखील होता. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
४१५ कोरोना बाधित पोलिसांवर उपचार सुरू
लॉकडाऊन काळात मुंबई पोलीस रस्त्यावर जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात होते. मुंबई पोलीस दलात आतापर्यत ७९०० जणांना कोरोनाची लागण झाली असून १०१ पोलीस शहीद झाले आहेत. सध्या मुंबईत ४१५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई पोलीस दलातील ८० टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Irfan shaikh