श्यामभाऊ कदम यांची सह-राज्य सचिव पदावर नियुक्ती
- by Santosh Jadhav
- May 05, 2024
श्यामभाऊ कदम यांची सह-राज्य सचिव पदावर नियुक्ती
नवी मुंबई : दिनांक ४ मे २०२४ रोजी नवी मुंबईचे माजी कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांना नवी मुंबईत आम आदमी पक्ष वाढविण्यात आणि एकंदरीत केलेल्या सतत उत्कृष्ट सक्रिय कामाची पोचपावती देत आप महाराष्ट्र राज्य कार्यकारणीकडून त्याची महाराष्ट्र प्रदेश सह-सचिव पदावर नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्याकडून त्यांना तसे नियुक्त पत्र देखील देण्यात आले आहे. या नियुक्तीसाठी राज्य सचिव डॉ. अभिजित मोरे यांचे सुध्दा मोलाचे मार्गदर्शन झाले.
पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या या नवीन जबाबदारी बद्दल मनपूर्वक आभार, माझ्या या नवीन नियुक्तीचे पूर्ण श्रेय, मी माझ्या नवी मुंबईतील सहकाऱ्यांच्या परिश्रमास देतो. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० मे पर्यत इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यात, तसेच २५ मे पर्यत आप दिल्लीतील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारकार्यात सेवा देत आहे. त्यानंतर लगेचच, कामाला लागून टीम आपचा विस्तार नवी मुंबई, मुंबई , ठाणे जिल्हा, पनवेल, रायगड आणि आजूबाजूच्या क्षेत्रात होण्यासाठी प्रयत्नशील राहील. आज महाराष्ट्र भरातून मोठ्या प्रमाणावर देशप्रेमी, सुशिक्षित, सुसंकृत, मेहनती, संविधान प्रेमी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे सुजाण नागरिक आप मध्ये सामील होत आहेत, त्यामुळे आप महाराष्ट्र तर्फे या पुढील सर्व स्थानीय लोकाधिकार संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढविण्यासाठी आपण तयारीला लागू या - श्यामभाऊ कदम
नवीन जबाबदारी बद्दल श्यामभाऊंचे अभिनंदन, या नवनियुक्तीमुळे आम आदमी पक्ष वाढवण्यासाठी मदतच होणार आहे - दिनेशभाऊ ठाकूर - अध्यक्ष - आप, नवी मुंबई
श्यामभाऊंच्या या नियुक्तीमुळे नवी मुंबईमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सहकार्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे आप नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, देवराम सूर्यवंशी, डॉ शरद देशमुख, सुलोचना शिवानंदन, सुधीर पांडे यांच्याकडून सुध्दा मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav