जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जयश्री फाउंडेशनचा प्रशंसक उपक्रम
- by Santosh Jadhav
- Jun 08, 2024
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जयश्री फाउंडेशनचा प्रशंसक उपक्रम
जयश्री फाउंडेशन व टॉर्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपस्थितीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढत्या तापमान व काळाची गरज लक्षात घेऊन तसेच समाजात पर्यावरण प्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने मागील ४ वर्षांपासून आत्तापर्यंत जयश्री फाउंडेशन मधील युवकांच्या अथक प्रयत्नांतून शेकडो झाडे लावण्यात आली व त्यांची काळजी देखील घेण्यात आली . या कार्यक्रमाचे यजमान डॉ.विशाल माने (सहाय्यक पोलीस निरीक्षक) ॲड. छाया तारळेकर (समाजसेविका/पर्यावरणवादी), टॉर्क कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड मधील कर्मचारी तसेच जयश्री फाउंडेशनचे सदस्य व नवी मुंबईतील अनेक नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे तसेच टॉर्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तसेच उपस्थित असलेल्या सर्व नवी मुंबई नागरिकांचे आभार व्यक्त करून त्यांस सन्मानार्थ व प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी १ वृक्ष लागवडीस भेट म्हणून देण्यात आले - ऋतुजा पुप्पालवर (सचिव - जयश्री फाउंडेशन)
जयश्री फाउंडेशनने वृक्षारोपणाचा हा उपक्रम पर्यावरण दिनानिमित्त आयोजन केला आहे. संस्थेतील सर्व युवकांना व सदस्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा - डॉ. विशाल माने (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
जयश्री फाउंडेशन हे विविध असे समाज उपयोगी व पर्यावरणपूरक कार्यक्रम नेहमी राबवत असते अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नेहमी होत असते तसेच आनंदाची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात युवक व तरुण मंडळी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत असतात - ॲड छाया तारळेकर (समाजसेविका)
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav