Breaking News
डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालय व नवी मुंबई पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा
नवी मुंबई : डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालयामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. अंमली पदार्थ सेवनाचे शारीरिक दुष्परिणाम कसे होतात याचे व्याख्यान देण्यात आले. तसेच कौटुंबिक नुकसान कसे होते हे चित्रफित दाखवून विद्यार्थ्यानी त्यापासुन सावध रहावे याचे हि मार्गदर्शन केले त्यावेळी विद्यार्थ्यानी शपथ घेवून अंमली पदार्थ सेवनापासुन दुर राहण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष डॅा. विजय डी. पाटील, प्रो. चान्सलर डॅा. शिवानी पाटील व नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी अमित काळे (पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा), डॅा. राजीव राव (अधिष्ठाता, स्कुल ॲाफ मेडीसिन), धनाजी क्षीरसागर (सहाय्यक आयुक्त), निरज चौधरी (वरिष्ठ पोलिस निरिक्षक अंमली पदार्थ विरोधी कक्ष), डॅा. शितल (मनोरुग्णतज्ञ) व विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर