Breaking News
महाराष्ट्रातील लेकींना उच्च शिक्षण मोफत
मुलींना विनामूल्य शिक्षणाची दारं उघडणारा शासकीय अध्यादेश जाहीर
नवी मुंबई : व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण ३६ % इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने तसेच मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत यासाठी महाराष्ट्रातील लेकींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले असून मुलींना विनामूल्य शिक्षणाची दारं उघडणारा शासकीय अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे.
रिपोर्टर