Breaking News
विधानसभेसाठी आपची नवी मुंबईत चाय पे चर्चा
नवी मुंबई : आम आदमी पार्टी नवी मुंबईसह, संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे , आप नवी मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज.
आप महाराष्ट्र कार्यकारणी तर्फे, येणारी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणाचा दृढनिश्चय केला , महाराष्ट्रचे सर्व विभागीय संघटक जोमाने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र सहप्रभारी गोपालभाई इटालिया, यांच्या निर्देशानुसार प्रभावी नियोजनासाठी आप महाराष्ट्रचे नऊ विभागीय प्रभाग करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नवी मुंबई विभागात ठाणे, पालघर, नवी मुंबई व पुणे विभागात अहमदनगर, सोलापूर, पुणे व कोल्हापूर विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर व पूर्व मराठवाडा विभागात बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व पश्चिम मराठवाडा विभागात संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नाशिक विभागात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पश्चिम विदर्भ विभागात अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व पूर्व विदर्भ विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. आप महाराष्ट्र कार्यकारणी तर्फे या सर्व जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांच्या आढावा घेण्यासाठी प्रत्येक विभागीय आणि जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका चालू आहेत.
सर्वप्रथम आप महाराष्ट्र कार्यकारणीकडून प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्रभरातील सामान्य जणांकडून इच्छुक उमेदवारांसाठी गुगल फॉर्म द्वारे डेटा संकलन करण्यात आले. आपच्या दिल्ली आणि पंजाबमधील सामान्यजनताभिमुख कामाच्या झपाट्यामुळे, महाराष्ट्रभरातुन इच्छूक उमेदवारांना आकृष्ट करीत या गुगल फॉर्मला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. एकट्या नवी मुबईतून २० पेक्षा जास्त स्थानिक नागरिकांनी लढण्याची इच्छा दाखविली आहे.
३ ऑगस्ट रोजी आप नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाली. या बैठकी दरम्यान राज्य सहसचिव आणि माजी नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांच्याकडून आप नवी मुंबईतील कार्यकर्त्यामधून १० इच्छूक उमेदवार आणि गुगल फॉर्म मधील २० अश्या एकूण ३० इच्छुक उमेदवारांची लिस्ट धनंजय शिंदे यांना सुपूर्द करण्यात आली.
आप राष्ट्रीय संघटक आणि राज्यसभा खासदार संदीप फाटक यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्रामधील सर्व २८८ जागांवर आपल्याला येणारी विधानसभा निवडणूक लढवायची आहे - धनंजय शिंदे - आप महाराष्ट्र उपाध्यक्ष
आप नवी मुंबईच्या दोन्ही विधानसभा मतदारसांघातील सर्व वॉर्ड अध्यक्षांनी आपआपल्या प्रभागातील वॉर्ड कार्यकारणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना घेऊन प्रचाराची सुरवात करावी - दिनेश ठाकूर - कार्यकारी अध्यक्ष - आप नवी मुंबई
नवी मुंबईतील इच्छूक उमेदवारांमधून ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघासाठी योग्य आणि सक्षम दोन उमेदवाराची निवड करण्याचे अधिकार आप नवी मुंबई एकमताने राज्य समितीला देत आहे - प्रीती शिंदेकर - उपाध्यक्ष - आप नवी मुंबई
राज्य समितीने ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघासाठी निवड केलेल्या उमेदवाराच्या मागे आप नवी मुंबई भक्कमपणे, एकमताने उभी राहून घवघवीत यशासाठी प्रयत्नशील राहील - देवराम सूर्यवंशी - उपाध्यक्ष - आप नवी मुंबई
रिपोर्टर