Breaking News
चेक देताच तासांत खात्यात पैसे जमा होणार - रिझर्व बँक
भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेत आज पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती गव्हर्नर दास यांनी दिली.
चेकचा निपटारा लवकरात करण्यासाठी बँकांत खास सिस्टिम लागू होणार आहे. म्हणजेच तुम्ही चेक बँकेत दिला तर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची काहीच गरज नाही. अगदी काही वेळातच पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.
या निर्णयाची माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, की बँकेत चेक क्लिअर करण्यासाठी जास्त वेळ लागू नये असे आम्हाला वाटते. हे काम काही तासातच व्हायला हवं. बँकेच्या ग्राहकांच्या अडचणी कमी करणे तसेच त्यांना चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने चेक ट्राझॅक्शन सिस्टिम (सीटीएस) मध्ये नजीकच्या काळात बदल करण्याचे प्रस्तावित आहे. आजमितीस चेक बँकेत दिल्यानंतर सर्व प्रक्रिया होऊन खात्यात पैसे जमा होण्यास एक किंवा दोन दिवस लागतात. चेक क्लिअर होण्यासाठी लागणारा वेळ, जमा केलेली रक्कम, चेकचे प्रकार, बँक आणि जमा करण्याची प्रक्रिया यांवरही बरेच काही अवलंबून असते.
रिपोर्टर