Breaking News
मानवी हक्क दिनानिमित्ताने चर्चासत्र आयोजित केले बाबत
तुर्भे : तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १०/१२/२०२४ रोजी एरोस्पेस इंजीनियरिंग कॉलेज, तुर्भे येथे विद्यार्थी / विद्यार्थिनी व शिक्षकांना मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर वेळी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. तुकाराम नागरे यांनी खालील प्रमाणे माहिती देऊन मार्गदर्शन केले. मानवी हक्क, पोलीस दलाची माहिती, सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध , व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध , आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय, जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी , मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलीस मदतीसाठी डायल ११२ व सायबर फ्रॉड हेल्पलाईन १९३० क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकामध्ये करावा. यांसारख्या विषयांवर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. नमूद मानवी हक्क दिन कार्यक्रम श्री.आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने सदर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास नमूद कॉलेजमधील सुमारे ५५ विद्यार्थी,शिक्षक, कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती शितल क्षीरसागर व तुर्भे पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे श्री. अरूण थोरात हे सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
रिपोर्टर