Breaking News
एफ.जी नाईक महाविद्यालयात सायबर साक्षरता व मी कायदा साक्षर याविषयी कार्यशाळा संपन्न
श्रमिक शिक्षण संस्थेचे एफ.जी नाईक महाविद्यालय कोपरखैरणे, नवी मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या आठवड्यामध्ये सायबर साक्षरता व मी कायदा साक्षर या विषयाला अनुसरून कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संभाजी कटारे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश शिंदे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अतिथींचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिक यांनी केले. या कार्यक्रमात प्रास्ताविक पर भाषणात प्रताप महाडिक सरांनी
सायबर फसवणुकीच्या प्रकाराची माहिती तसेच सायबर सुरक्षा किती महत्त्वाची आहे आणि ती आपल्या दैनंदिन उपयोगात आपण आणून त्यापासून कसे वाचू शकतो याबद्दल माहिती सांगितली तसेच फोन द्वारे किंवा प्रत्यक्ष फोनवर बोलून, एस एम एस किंवा व्हाट्सअप द्वारे लिंक पाठवून सोशल मीडिया अकाउंट हॅक करून एखाद्या व्यक्तीची वेगळ्या प्रकारे फसवणूक होत असते. ही फसवणूक कशी टाळली पाहिजे त्यासाठी आपण साक्षर होणं फार गरजेचे आहे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिकसर यांनी चला सायबर साक्षर होऊयात! स्वतःची व इतरांची फसवणूक टाळूया! हा नारा दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. संभाजी कटारे वरिष्ठ पोलीस, श्री. राजेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सचिन गवते पोलीस निरीक्षक, श्री. संतोष माने पोलीस निरीक्षक, श्री. सतीश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या संकल्पनेतून मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय कायदा साक्षरता व सायबर साक्षरता अभियान यांची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जशी संगणक साक्षरता महत्त्वाची आहे तशीच यापुढे कायद्याविषयीची मूलभूत साक्षरता व जागृती सुद्धा महत्वाची आहे त्या दृष्टीने तरुणाईला विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्याना कायद्याच्या तरतुदींविषयी सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन करणे व त्यांच्याकरवी समाजामध्ये साक्षरता वाढविणे हा आहे.
व्याख्यानाचे प्रारूप अशा प्रकारे होते की महाविद्यालयामध्ये एक साक्षरता संघ असेल म्हणजेच लीगल लिटरसी क्लब आणि सायबर लिटरसी क्लब असेल. लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी विधी ज्ञानाच्या मदतीने सात दिवस व्याख्यान घेऊन संकल्पना विद्यार्थ्याना समजावून सांगतील तसेच सायबर फ्रॉड विषय जनजागृती करण्यात आली तसेच कायदा साक्षरता अभियान याविषयी पुस्तक दिली. उपक्रम सुरू केल्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्याना कायदा साक्षरता प्रमाणपत्र दिले जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून हे विद्यार्थी उपक्रमाशी जोडले जातील व हे दृकश्राव्य माध्यमातून अधिक लोकांना कायदा साक्षर करतील तसेच इतरांना सायबर सुरक्षितेविषयी जागृत करतील हे या व्याख्यानाचे प्रारूप होते.
मी कायदा साक्षर या व्याख्यानामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. संभाजी कटारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय वाशी पोलीस ठाणे यांनी प्रमुख फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) भारतीय साक्षरता अभियान २०२३ (BSA) तसेच कायद्यातील महत्त्वाच्या संज्ञा स्पष्ट केल्या.
सायबर साक्षरता या व्याख्यानात पोलीस निरीक्षक श्री. संतोष माने यांनी सायबर फसवणुकीच्या प्रकारांची माहिती तसेच सुरक्षा उपाय स्पष्ट केले. यामध्ये विविध सायबर फसवणूक लिंक द्वारे घडणाऱ्या फसवणूक केवायसी फसवणूक म्हणजे काय सैनिकांची सैनिकांची ओळख भासून फसवणूक व्हिडिओ कॉल्समुळे होणारी फसवणूक ओटीपी फसवणूक व त्यांचे प्रमुख प्रकार तसेच फेसबुक फेक प्रोफाईल पासून फसवणुकीचे प्रकार याबद्दल सखोल माहिती विद्यार्थ्याना सांगितली तसेच त्या प्रश्नांवर उपाययोजना काय आहेत जसे की मोबाईल ॲप्लिकेशन सुरक्षा कशी करायची सायबर फसवणुकी ही कशी टाळावी आपण सायबर फसवणुकीचे बळी झाल्यास काय करावे आणि फसवणूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसांचे पाऊल कशाप्रकारे आहे हे सर्व त्यांनी सखोल पद्धतीने विद्यार्थ्याना समजाविले. या कार्यशाळेचे नियोजन डॉ. रवींद्र शिसवे (IPS)पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एफ. जी .नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रमोद साळुंखे व डॉ.कविता पवार तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. या मोलाच्या उपक्रमात तब्बल १२० स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद साळुंखे व आभार डॉ. कविता पवार मॅडम यांनी मानले.
रिपोर्टर