दंड १० हजारांचा , पावती २ हजाराची , नेरुळ विभाग कार्यालयाचा गजब कारभार
- by Vikas Banpatte
- Apr 26, 2021
दंड १० हजारांचा , पावती २ हजाराची , नेरुळ विभाग कार्यालयाचा गजब कारभार
नवी मुंबई : अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांव्यतिरिक्त जर एखादे दुकान सुरु असेल तर त्याला प्रथमदर्शी १० हजार रुपयांचा दंड आहे.त्यानंतर पुन्हा जर तेच दुकान सुरु राहिले तर २५ हजार व नंतर ५० हजार रुपयांचा अश्या दंडाची तरदूत आहे.असे असतांनाही नेरुळ मधील मनपा अधिकाऱ्याने एका कपड्याच्या दुकानदाराला फक्त दोन हजारांचा दंड ठोठावला आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी मनपा अधिकाऱ्याने दुकानदाराला आयुक्तांचे निर्देश डावलून दंडात्मक कारवाई केली असल्याचे निदर्शनास आले आहे.
संपूर्ण राज्यात कोव्हीड १९ ची चैन रोखण्यासाठी ब्रेक द चैन मिशन सुरु असून त्याला प्रतिसाद देण्याऐवजी काही व्यापारी छुप्या पद्धतीने त्याचा नियमभंग करताना दिसून येत आहे. यावर कठोर कारवाई होणे गरजेचे असतांना मनपा अधिकारीही त्याला प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. नेरुळ सेक्टर १९ मध्ये सिनियर जुनियर हे कपड्याचे दुकान टाळेबंदीतही सुरु असल्याचे कळताच नेरुळ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत त्यावर कारवाई केली. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार अश्या दुकानदारावर प्रथम १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई तर त्या नंतर २५ व ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे तर त्यावर गुन्हा दाखल करण्याचेही निर्देश आहेत.असे असतांना कोणत्या नियमांच्या आधारे मनपा अधिकाऱ्याने संबंधित दुकानधाराला २ हजार रुपयांचा दंड ठोठावला अशी चर्चा व्यापारी वर्तुळात सुरु आहे.इतर दुकानधारकांवर सुरवातीलाच १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होतांना दिसून येत असल्याने या दुकानदारांवर मनपा अधिकारी मेहरबान का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संपूर्ण राज्यासह नवी मुंबईतही बुधवारी रात्री आठपासून कडक निर्बधांसह आणि नवीन नियमावलीसह टाळेबंदी सुरू करण्यात आली असून त्यासाठी पालिकेसह पोलीस प्रशाशन सज्ज झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी नियमावलीचे पालन करून पालिका व पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्बध काळात शहरात तब्बल एक हजार पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत.तरीही काही दुकानदार प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी त्याचा दुरुपयोग करतांना दिसून येत आहेत. संचारबंदीच्या काळात अनेक नागरिक बिनधास्त व मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे कडक टाळेबंदीच्या निर्णयाची बुधवारी सायंकाळपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द मिशन सुरु असून त्यासाठी मनपा आयुक्तांनी निर्देश जारी केले आहेत.त्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यावर प्रथम दंडात्मक कारवाई व नंतर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.याचे उल्लंघन झाल्यांस कठोर कारवाई करण्यात येईल.
सुजाता ढोले - अतिरिक्त आयुक्त ,नवी मुंबई महानगरपालिका
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Vikas Banpatte