Breaking News
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं. ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी १० वाजता गायवकवाड यांचं निधन झालं. एकनाथ गायवाड हे माजी खासदार तसंच मुंबईचे काँग्रेसचे प्रभारी राहिले आहेत. तसंच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.
एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता करोना मुळे दु:खद निधन झालं. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.
एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द
एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं.
राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपद भूषवले देखील होते. एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.
एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. सर्वाना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.
रिपोर्टर