निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांना मोठा झटका; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
- by Santosh Jadhav
- Nov 01, 2025
निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांना मोठा झटका; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. तिसरे अपत्य असूनही ती माहिती लपवणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे. यामुळे, आगामी निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ धोरण कायम :
‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ या धोरणाचा प्रचार करण्यासाठी राज्य सरकारने २००५ साली एक कायदा आणला होता. यानुसार, सप्टेंबर २००१ नंतर ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये झाली आहेत, अशी व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. मात्र, अनेक उमेदवार तिसरे अपत्य असल्याची माहिती लपवत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले होते.
या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, परंतु न्यायालयानेही आयोगाचा निर्णय कायम ठेवला. आता मुख्य माहिती आयुक्त पाडे यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
गैरप्रकार टाळण्यासाठी ‘एसओपी मुख्य माहिती आयुक्त पाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका आढावा बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या ‘एसओपी’मुळे तिसरे अपत्य लपवून निवडणूक लढवणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे.
पत्राद्वारे स्पष्ट केल्या सूचना :
निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. या पत्रात स्पष्ट केले आहे की, सरपंचासह उमेदवाराने (पुरुष वा महिला) दोनपेक्षा जास्त अपत्ये (जी सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेली आहेत) लपवल्यास तो अपात्र ठरेल.
तसेच, २००१ नंतर जन्मलेल्या तिसऱ्या अपत्याला दत्तक दिल्यास किंवा अपत्याचा जन्म इस्पितळाऐवजी घरी झाला तरी, तो उमेदवार कायद्याने अपात्रच ठरेल.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav