विद्युत महामंडळ जुनी सदोष केबल परत ठेवून पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्यास वाव देत आहे.
- by Santosh Jadhav
- Apr 28, 2021
विद्युत महामंडळ जुनी सदोष केबल परत ठेवून पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्यास वाव देत आहे.
रविवारी रात्री एकच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर १ मधील अण्णासाहेब पाटील बागेत विद्युत केबल अचानक जळून खाक झाली. ज्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. नागरिकांना उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेत आम आदमी पार्टीचे , प्रभाग ३७ चे अध्यक्ष, अभिषेक पांडे यांनी, सकाळी विद्युत महामंडळ कर्मचार्यांच्या घटनास्थळी भेट दिली व समस्या शक्य तितक्या लवकर सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर विद्युत महामंडळ कर्मचार्यांनी काम सुरू केले. त्यात मागील दुरुस्तीचे काम गेल्या बारा तासांपासून सुरू होते, केबलची जागा बदलून ती भूमिगत करण्याची मागणीही केली गेली आहे.
आम आदमी पार्टीला नवी मुंबईतील सामान्य नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे , प्रत्येक वॉर्ड मधून सुसंकृत , सुशिक्षित लोक आप नवी मुंबईत सामील होत आहेत. आपचे वार्ड अध्यक्ष पण जनतेच्या समस्याची त्वरीत नोंद घेऊन त्याचे निवारण करीत आहेत.
कोपरखैरणे वॉर्ड क्रमांक ३७ मधील गटर (नाला) भरलेला होता आणि काही ठिकाणी कचरा पण साठलेला होता ह्या समस्येचा पण वारंवार पाठपुरावा नवी मुंबई महनगरपालिकेत करून त्यांच्या सहकार्याने निवारण करण्यात आले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav