आरंभ संस्थेने उभारले जिल्हा परिषद विद्यार्थ्यासाठी सुसज्ज सौचालय
- by Saptahik Kokan Samana
- May 28, 2021
आरंभ संस्थेने उभारले जिल्हा परिषद विद्यार्थ्यासाठी सुसज्ज सौचालय
पनवेल : आजही बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो, विद्यार्थ्याना शाळेत शिक्षणासोबत काही भौतिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. असे पाहायला मिळते की आपल्या परिसरातील च्या काही शाळांमध्ये व्यवस्थित सौचालये सुद्धा नाहीत, अशा परिस्थितीत विद्यार्थी उघड्यावर किंवा आडोश्याचा यासाठी वापर करतात, यामुळे अनुचित प्रकार घडतात तसेच रोगराई पसरते.
सर्व मुलांचे काही मूलभूत हक्क आहेत, त्याचे हनन नाही व्हावे यासाठी वेळोवेळी पाऊले उचलली पाहिजे, या सर्व विषयांवर आरंभ संस्था सन १९९६ महाराष्ट्रभर उपक्रम राबवते, त्याच अनुषंगाने रायगड जिल्हा परिषद शाळा, चिरवत, पनवेल येथे सुसज्ज सौचालय उभे केले आहे, यामूळे शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक लाभांकित होणार आहेत, यामुळे शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिरवत मधील रहिवाशी, मुख्याध्यापक आणि शिक्षक आरंभ संस्थेचे आभार व्यक्त करत आहेत. या कार्यात सक्षम फौंऊडेशनने मोलाची भूमिका बजावली, आरंभ संस्था, शिक्षण विभाग यांच्याशी समन्वय साधून कार्य मार्गी लावले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मित्राक्षी तांडेल यांनी सर्वाचे आभार मानले, तसेच त्या म्हणाल्या विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, विद्यार्थीनी आणि महिला शिक्षकांसाठी याचा मोठा लाभ होणार आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Saptahik Kokan Samana