यादवनगर येथील शौचालयासाठी राखीव भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांवर निष्कासन कारवाई
- by Santosh Jadhav
- Jun 03, 2021
यादवनगर येथील शौचालयासाठी राखीव भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांवर निष्कासन कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यावर धडक कारवाई करण्यात येत असून अतिक्रमण विभागामार्फत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. ०६, यादवनगर जयभवानी नगर येथे भू.क्र. टी - २२ व टी - २३ शौचालयासाठी राखीव असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले.
टीटीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये शौचालयाच्या प्रयोजनासाठी भू.क्र. टी - २२ व टी - २३ महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ कडून दि.१६ सप्टेंबर २०१९ रोजी सीमांकन व करारनामा करुन महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. याठिकाणी ११ मीटर x १७ मीटरच्या भूखंडावर एकूण ०६ सिमेंट पत्रा शेडच्या झोपडया उभारण्यात आलेल्या होत्या. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई ऐरोली विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता राकेश डी. निमेष, राबाडा एमआयडीसी पोलिस ठाणे यांचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गिते व त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी / कर्मचारी, अतिक्रमण पोलिस पथक, जी विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आली. यापुढील काळतही अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण यावर अशा प्रकारच्या धडक कारवाया केल्या जाणार आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav