१० जूनला होणारे दिव्यांगांचे विशेष लसीकरण सत्र अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे
- by Santosh Jadhav
- Jun 09, 2021
१० जूनला होणारे दिव्यांगांचे विशेष लसीकरण सत्र अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे
१० जूनला महानगरपालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाही
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्षावरील दिव्यांगाकरिता १० जून २०२१ रोजी ३ रूग्णालयात आयोजित करण्यात आलेले विशेष लसीकरण सत्र आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस बघता तसेच हवामान खात्याने १० ते १२ जून २०२१ या कालावधीत दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता दिव्यांगाना कोणत्याही प्रकारची अडचण व त्रास होऊ नये म्हणून पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या लसीकरणाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
त्याचप्रमाणे उद्या दि. १० जून २०२१ रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची नियमित सत्रेही होणार नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणाच्या यापुढील सत्र आयोजनाबाबत सूचना जाहीर करण्यात येईल.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav