केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता योजनेबाबत आवाहन
- by Pandurag Tirthe
- Jun 17, 2021
केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत
अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता योजनेबाबत आवाहन
मुंबई : केंद्र शासनने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजुर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन निर्णय दि. 8.3.2019, 9.12.2020 व 26.3.2021 अन्वये योजनेच्या अटी व शर्ती तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रांची सूची जाहिर केलेली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्यांचे सांकेतिक क्रमांक 201903081643216222, 202012101531252722 व 202103261633277622 असे आहेत.
राज्यातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक यांना फ्रंट एंड सबसिडी बँकेने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर व अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकाने 10 टक्के रक्कम स्वहिस्सा भरणा केल्यानंतर 15 टक्के मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.
त्या अनुषंगाने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-1, चौथा मजला, आ.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-400071 कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Pandurag Tirthe