भाजपला मोठा धक्का, गोंधळ घालणाऱ्या १२ आमदारांचे निलंबन
- by Irfan shaikh
- Jul 05, 2021
भाजपला मोठा धक्का, गोंधळ घालणाऱ्या १२ आमदारांचे निलंबन
मला आई बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. असा आरोप तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मांडताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी आरक्षण जाण्याला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. छगन भुजबळ यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
हा प्रस्ताव मंजूर होत असताना आमदार गिरिश महाजन आणि आमदार संजय कुटे हे थेट तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोर येऊन घोषणा देऊ लागले. या घोषणा देत असताना भास्कर जाधव यांनी त्यांना समज देखील दिली. मात्र, ही घोषणाबाजी सुरु असतानाच भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा करत, सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं.त्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बैठक झाली. या बैठकीत तालिकाध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे. भाजप नेते धमकी आणि गुंडगिरीचं काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
यावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले. मात्र, सभागृहात तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मला आई बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. असं सांगितलं. त्यानंतर अशा प्रकारचा गोंधळ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केलं.
गिरिश महाजन, संजय कुटे, अभिमन्यु पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, राम सातपुते, नारायण कुचे, अतुल भातखळकर, बंटी भागडिया, हरिष पिंपळे, जयकुमार रावल या बारा आमदारांचा समावेश आहे. हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Irfan shaikh