Breaking News
अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना देशीबनावटीचे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांचेकडून अटक
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे , खरेदी / विकी करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त , नवी मुंबई व अपर पोलीस आयुक्त - डॉ.बी जी. शेखर पाटील नवी मुंबई यांनी आदेशीत केले आहे . त्यानुसार प्रविणकुमार पाटील - पोलीस उपायुक्त व विनोद चव्हाण - सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेकडुन अवैधरीत्या अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे , खरेदी / विकी करणारे इसमांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे . दिनांक ११/०७/२०२१ रोजी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे पोना / २७ ९ १ मेघनाथ पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बेलपाडा बसस्टॉप जवळ , खारघर , मुंबई - पनवेल हायवे रोड या ठिकाणी अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचे दोन इसम येणार असुन त्यांचे ताब्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र व दारूगोळा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी / अंमलदारासह बेलपाडा बसस्टॉप , खारघर याठिकाणी सापळा लावुन इसम नामे १ ) ओमनाथ सोलानाथ योगी , वय २३ वर्षे , रा . जुईगाव , मंगेश भोपी यांची बिल्डींग , तळ मजला , कामोठे , नवी मुंबई . मुळ रा . गडवाई , पो . भोजपुरा , ता . आसिन्द , जि . भिलवाडा , राजस्थान . २ ) नंदलाल मेवालाल गुर्जर , वय ३० वर्षे , रा . ए –२ , रूम नं . २३७ , तळ मजला , सेक्टर २० , तुर्भे , नवी मुंबई मुळ रा . गडवाई , पो . भोजपुरा , ता . आसिन्द , जि . भिलवाडा , राजस्थान यांना ताब्यात घेतले . त्यांचे अंगझडतीमध्ये ०२ देशी बनावटीचे पिस्टल , ०२ जिवंत काडतुसे व मोबाईल फोन इ . एकूण १,०३,८०० रु.किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचेविरूध्द खारघर पोलीस ठाणे गु.र.नं. २५६/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह म.पो.का.कलम ३७ ( १ ) , १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना दिनांक ११/०७/२०२० रोजी अटक करण्यात आलेली असुन दि . १४/०७/२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी आहे . आरोपी यांचेकडे अग्निशस्त्रे मिळुन आल्याने त्यांचा बेकायदेशीर शस्त्रे बाळगण्याबाबतचा नेमका काय उद्देश होता . तसेच ते अग्निशस्त्रे कोठून आणले याबाबत सखोल तपास मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांचेकडुन चालु आहे . सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक - एन.बी.कोल्हटकर , पोउपनि - प्रशांत ठाकुर , अमलदार - मेघनाथ पाटील , नितीन जगताप , विष्णु पवार , सचिन टिके , सतिश चव्हाण , यांनी केलेली आहे .
रिपोर्टर