आप नवी मुंबई तर्फे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणसह इतर कार्यक्रमासह उत्साहाने साजरा
- by Santosh Jadhav
- Jan 27, 2022
आप नवी मुंबई तर्फे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणसह इतर कार्यक्रमासह उत्साहाने साजरा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर, जुहूगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक कांतीलालजी जैन यांचा कार्यकर्त्यासह आप नवी मुंबईत पक्ष प्रवेश
नवी मुंबई : आप नवी मुंबईला सर्व भागातून तरुणाईचा वाढत चाललेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, बुधवार २६ जानेवारी रोजी ७३ वा स्वतंत्रता दिवस नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे आणि नेरुळ विभागात उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या शुभमुहूर्तावर, जुहूगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक कांतीलालजी जैन यांचा कार्यकर्त्यासह आप नवी मुंबईत पक्ष प्रवेश करण्यात आला. या प्रसंगी आप नवी मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांच्याकडून कांतीलालजी जैन यांची नवी मुंबई उपाध्यक्ष तसेच त्यांचे सहकारी महेश भगत यांची विभागीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. महेश यांच्याकडे मुख्यतः वाशी परिसरातील जुहूगाव आणि इतर विभागातील वॉर्ड्स मध्ये पक्षबांधणी करण्याची जबाबदारी राहील.
प्रथमतः ऐरोली विभागातील कुलविंदर यांच्या कार्यालयाबाहेर, स्थानिक पदाधिकारी , नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर , साबळे यांच्या सहकार्याने , त्या नंतर कोपखेरने सेक्टर ८ येथे विभागीय अध्यक्ष मानसी पवार , कौशल सिंग यांच्या सहकार्याने, त्या नंतर कोपरखैरणे सेक्टर - ८ व सेक्टर - २ येथील सुमित कोटियान यांच्या ऑफिस समोर, त्या नंतर तुर्भे येथे सुनील जाधव , राहुल मेहरोलिया यांच्या ऑफिस समोर , नंतर नेरुळ येथे मर्चड नेव्हीतील निवृत्त चीफ इंजिनियर सुधीर पांडे यांच्या ऑफिस समोर, महेश क्षीरसागर यांच्या सहकार्याने कार्यक्रम करण्यात आले. या सर्वच ऑफिसेस मध्ये, राष्ट्रगीतासह ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यासाठी सर्वच विभागातील कार्यकर्त्यानी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी, कार्यकर्त्याकडून देशभक्ती प्रेरित घोषणा देत लवकरच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढेंगे - जितेंगे अशी घोषणा देऊन निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav